न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील सर्व्हिस रस्त्यावर महामेट्रोकडून मेट्रो मार्गिकचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. त्यामुळे वाहनचालक वैतागले होते.
अखेर, त्याची दखल घेऊन महामेट्रोने पिलरभोवती डांबरीकरण करून बॅरिकेड्स काढून घेऊन रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.











