न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील मदर टेरेसा उडाणपुलावर बीआरटीएसचा बस थांबा बांधण्यात येणार आहे. या कामासाठी शनिवारी (दि. ४) व रविवार (दि. ५) रोजी ऑटो क्लस्टरहून काळेवाडीकडे जाणारा उड्ाणपुल वाहतुकीस बंद ठेवला जाणार आहे.
महापालिकेकडून काळेवाडी फाटा चौक ते देहू-आळंदी रस्ता, चिखलीपर्यंत बीआरटीएस मार्ग विकसित करण्यात येत आहे. सदर मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. या मार्गावरील टेरेसा उडाणपुलावर चिंचवड लिंक रस्ता बाजूकडे बस थांबा बांधण्यात येणार आहे.
त्यासाठी शनिवारी व रविवारी उङ्गाणपुलावरील वाहतुक बंद ठेवली जाणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी इतर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी केले आहे.











