न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- देहूरोड येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. अक्षय लक्ष्मण शिंदे (वय २१, रा. वाघेश्वरनगर झोपडपट्टी, गोरेवस्ती, वाघोली), देविदास उर्फ अमोल नागनाथ लष्करे (वय २३, रा. सिद्धार्थनगर, वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना माहिती मिळाली की आरोपी मुकाई चौक येथे थांबले आहेत. लगेचच पोलिसांनी चौकात सापळा रचून अक्षय आणि देविदास यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा अजित साळवी आणि सचिन साठे यांच्या सांगण्यावरून केला आहे, असे सांगितले. त्यांच्यासोबत अन्य दोन आरोपी असल्याचेही आरोपींनी सांगितले. त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपासासाठी देहूरोड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.











