न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२४) :- हॉटेलचा कोणाताही वैध परवाना नव्हता. तरीही खाद्य पदार्थासोबत लोकांना हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पिण्याचा फ्लेवर तसेच, हुक्का पिण्यासाठी लागणारे इतर साहित्य पुरवले. लोखंडी शेगडीमध्ये कोळसा पेटवुन कोणतीही सुरक्षतेतीची काळजी घेतलेली दिसुन आली नाही, असं फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान (दि. १८) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. बेल बॉटम हॉटेलचा मालक १) सुमित भिकनराव संधानशिव वय २६ वर्षे रा. ओम कॉलनी नं ३ बिजली नगर चिंचवड, स्टाफ २) राजनकुमार रॉय रा. राज वाईन शॉपीचे पाठीमागे हिंजवडी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ८७१/२०२४ भा.न्या.सं. कलम २८७,१२५,३ (५) सह सिगारेट व अन्य तबाखू जन्य उत्पादने अधि. कलम ४,७,२१ व सुधारणा अधिनियम कलम सन २०१८ चे कलम ४(अ),२१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि महाले तपास करीत आहेत.














