न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ४ मे २०१९) :- नातवाला सांभाळण्यासाठी तसेच घर कामासाठी एका सेविकेची गरज होती, घर कामासाठी मोलकरीण देतो सांगून, २६ हजार रुपये बँक खात्यावर मागवून, फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार बावधन येथे घडला. या प्रकरणी भास्कर दौलतराव वसाने (६५, रा. बावधन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर नितीनसिंग (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.











