न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :- पुण्यात भाजपाच्या वतीने दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित झाला.
यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अमित गोरखे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सचिव विनोद तावडे, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवार, केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.












