- दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका – अजितदादा..
- महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा दिला नारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :-ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल, त्यांना समजावून सांगा. कोण येऊन काही सांगत असेल तर त्यांना शहराबद्दल फार काही जिव्हाळा आहे, असे नाही. अजित पवार म्हणजे पिंपरी-चिंचवड आहे. कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (दि. २१) मेळावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, योगेश बहल, राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अपर्णा डोके, शमीम पठाण, वसंत लोंढे, पंडित गवळी, श्याम लांडे, सतीश दरेकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष जगताप उपस्थित होते.
पुण्यामध्ये डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकले याचे रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण ‘मी साहेबांना बोलू दिले नाही’ असे म्हणतात. अरे, मी कसा बोलू देणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. काय घडले, काय नाही या खोलात जात नाही, आम्ही अनादर करणारे लोक नाहीत, असेही पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या तत्त्वाने काम करणारे महायुतीचे सरकार आहे. मात्र, लोकसभा प्रचारात विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला नागरिक बळी पडले आणि त्याचा फटका आम्हाला बसला.
अजित पवार यांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठे केले. मात्र, दादा तुमच्या पुढे पुढे करणारे मोठे होऊन तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे, असे म्हणत अजित गव्हाणे यांच्यावर माजी आमदार विलास लांडे यांनी टीका केली. दरम्यान, विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता. मात्र, आता विलास लांडे यांनी गव्हाणेंना लक्ष केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीबरोबर, यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपण आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.













1 Comments
Ma Jonassen
I have been exploring for a bit for any high quality articles or blog posts on this sort of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Reading this information So i’m happy to convey that I’ve a very good uncanny feeling I discovered just what I needed. I most certainly will make sure to don’t forget this site and give it a look regularly.