न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- भारतीय जनता पक्षाच्या पुणे या ठिकाणी पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे, माजी विरोधीपक्ष नेत्या व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी निषेध नोंदवला.
या आंदोलनास युवासेना प्रमुख चेतन पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष तुषार नवले, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अनंत कोऱ्हाळे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, पिंपरी विधानसभा महीला संघटिका डॉ.वैशाली कुलथे, चिंचवड विधानसभा उपशहर संघटिका ज्योती भालके, उपविभाग संघटिका तस्लिम शेख, नीता लोखंडे, संदीप भालके, माधव मुळे, निखिल दळवी, कुदरत खान, ऋषिकेश सोनकांबळे, गोपाल मोरे, दीपक भक्त व शिवसैनिक – पदाधिकारी उपस्थित होते.











