- जाधववाडी धरण शंभर टक्के भरले; जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. २५ जुलै २०२४) :- मावळ तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे. मोठ्या प्रमाणावर नद्या-नाल्यांमध्ये पाणी वाढले आहे. जाधववाडी तलाव देखील शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी गावची पाण्याची चिंता मिटली आहे.
दरम्यान हा तलाव “द्वारविरहित” आहे. त्यामुळे पाऊस व धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात अनियंत्रित विसर्ग चालू झालेला आहे. नदीपात्रालगतच्या भागातील नागरिकांनी नदीजवळ जाऊ नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन मोशी पाटबंधारे शाखेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.















