- प्रत्यक्षात प्लॉटची केली तिर्हाईताला विक्री..
- चऱ्होलीच्या भानुषी नंदन प्लॉटींगमधील प्रकार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- दोघांना खरेदीखत करुन लिहुन देण्याचे मान्य व कबुल केले. त्याची विसापावाती करारनामा नोटरी वकीलांसमक्ष करून घेतला. प्लॉट खरेदी देण्याच्या बहाण्याने रोख स्वरुपात व ऑनलाईन बँकीगद्वारे एकण १७,००,००० रुपये स्वीकारले. प्लॉटचे रितसर खरेदीखत लिहून न देता दोघांच्या परस्पर त्रयस्तास त्याची विक्री केली.
दरम्यान दोघांनी इसमाकडून प्लॉट विकत देण्याच्या बहाण्याने स्वीकारलेले पैसे परत मागीतले. तडजोडीअंती एकुण २३ लाख रूपये चेकद्वारे देण्याचे मान्य करून दोघांना बँकेचा पीडीसी चेक दिला. सदरचे दोन्हीही चेक बँकेत वटविण्यासाठी जमा केले असता. सबंधित इसमाने बँकेत जाऊन जाणीवपूर्वक फसवणूक करण्याचे हेतुने सदर चेक स्टॉप करून दोघांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना नोव्हेंबर २०१९ (नक्की ता वेळ माहित नाही) ते दि ०८/०४/२०२४ रोजी चर्होली बु. जमीन गट नं ३१८/१ या मिळकतीमध्ये सुरु असलेल्या भानुषी नंदन प्लॉटींगमध्ये घडली.
फिर्यादी रंजीत कैलास घुले (वय ३६ वर्षे, रा. बोपखेल) यांनी आरोपी १) नितीन प्रकाश पठारे (रा. कळस, पुणे; मुळ रा पठारेमळा च-होली बु ता हवेली जि पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलिसांनी ३२३/२०२४ भादवि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि अंभोरे पुढील तपास करीत आहेत.














