- भाजपचे सचिन काळभोर यांची कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- मुंबई-पुणे महामार्गावर निगडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते तालेरा पोर्ट ह्या ठिकाणी बेकायदेशीर झाडे तोडण्यात आली आहेत. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
वृक्ष लावा वृक्ष जगवा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाहिरात करुन कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. दुसऱ्या ठिकाणी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ठेकेदार ह्यांना झाडे तोडण्यासाठी कोट्यावधी रुपये देऊन झाडांची तोडणी करत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी नाराज झाले आहेत.
शहरातील बहुतांश भागात झाडे तोडण्यासाठी मनपा ठेकेदार ह्यांना आथिर्क रसद देऊन पोसद आहे. निगडी पोलिस ह्यांनी झाडे तोडण्यासाठी काम बंद केले आहे.











