न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- अक्षर फिल्मसचा सांजिदा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करुन देण्याच्या नावाखाली कमीशनपोटी ०७,०५,८०० रुपये ऑनलाईन आर.टी.जी. एस. द्वारे स्वीकारले. तसेच आणखी एका कंपनीकडुन कमिशनपोटी ५,४०,००० रुपये, असे एकुण १२,४५,८०० रुपये घेतले.
चित्रपट रिलीज करुन त्याचे पैसे न देता स्वतःच्या फायदयासाठी वापर करुन दोघांची फसवणुक केली आहे. ही घटना एप्रिल २०२१ ते ३० जून २०२४ पर्यंत बाणेर येथे घडली.
फिर्यादी बलभीम सखाराम पठारे (वय-५७ वर्षे, धंदा-व्यवसाय) यांनी आरोपी व्हिमास कंपनीचे संचालक साकेत सावंत, आरोपी महिला संचालिका, आरोपी महिला, महिला आरोपी मॅनेजर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी ८९४/२०२४ भा.द.वी कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मसपोनि जाधव तपास करीत आहेत.














