न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- फ्लोरा अॅक्टीव्ह कॉमर्सीओ दि कॉसमेटीक लि. या विदेशी ट्रेडमार्क असणाऱ्या कंपनीच्या कॉसमेटीक उत्पादनासारखी हुबेहुब बनावट उत्पादने तयार केली. ती पिंपरीतील रिव्हर रोड येथे क्रिष्णा कॉसमेटीक दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीसाठी उपलब्ध केली.
फिर्यादी यांच्या स्वामीत्व असलेल्या वस्तूचा व्यवसाय करीत असतांना दुकानदार मिळून आला आहे. हा प्रकार (दि. ३१/०७/२०२४ रोजी सायंकाळी ६.१० ते ८.१० वाजता उघडकीस आला.
याप्रकरणी संदिप हरीष गिडवानी (वय ४१ वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. अंधेरी वेस्ट मुंबई) यांनी विरेंद्र रामलखन यादव (वय ४० वर्ष, रा. शास्त्रीनगर पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६९१/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि कापरे पुढील तपास करीत आहेत.














