- चौघं गजाआड; घुसखोरीच्या मार्गाने केला होता भारतात प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- चौघा बांगलादेशी नागरिकांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतामध्ये वास्तव्य केलं. वैध व्हिसाशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिका-यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. भारतामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर रहात असताना मिळून आले.
तसेच सागोर सुशांतो बिस्वास याने भारतामध्ये बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवला. त्या आधारे पासपोर्ट तयार केला. तसेच ती बनावट कागदपत्रे सांगवी पोलीस स्टेशन येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (पी.सी.सी.) पोलीस पडताळणी दरम्यान सादर केली. हा प्रकार सन २०१५ पासुन ते दि. ३१/०७/२०२४ रोजी पर्यंत पिंपळे सौदागर, सांगवी, पुणे, कोथरुड, कोंढवा, पुणे येथे घडला.
याप्रकरणी १) सागोर सुशांतो बिस्वास, रा. फ्लॅट नं. ८/१/६, केशवनगर, ब्लॉक सेक्टर, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड मुळ रा. ग्राम दोरीशोलोई, पो. आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि. मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश, २) देब्रोतो वोबेन बिस्वास, सध्या रा. हॉटेल संदिप, साई मिलेनिअम शॉपिंग मॉल, पुनावळे, पुणे, एसओ वोबेन बिस्वास, नारिकेला, नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल, मुळ पत्ता दोरीशोलोई, पो. आरपारा, पोस्टे. शालिया, जि. मागुरा, विभाग खुलना बांगलादेश, ३) जॉनी वोबेन बिस्वास, सध्या रा. हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे, एस ओ वोबेन बिस्वास, नारिकेला, नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल, ४) रोनी अनूप सिकदर, सध्या सध्या रा. हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे, सर्व्हे नं. ६३, नानकनगर, कोंढवा खुर्द, पुणे नगर रोड, पुणे मुळ पत्ता बाहिर नोगोर, पो. भिमपुर, जि. फरिदपुर, देश बांगलादेश यांना अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलिसांनी ३१५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (२) (३), ३४०(२), ३(५) सह परकीय नागरिक कायदा चे कलम १४(अ) (ड) (ए) सह पारपत्र अधिनियम १९६७ थे कलम १२ सह पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३ (अ) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोउपनि कणसे पुढील तपास करीत आहेत.















