न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- पाच जणांनी त्यांचा फ्लॅट फायनान्स बँकेत तारण ठेवला होता. त्यावर १२,००,००० रूपये व्यावसाय कर्ज घेतले होते. हेतुपुर्वक आर्थिक फसवणूक करण्याच्या इराद्याने त्यांनी सदर फ्लॅट हा कोठेही गहान नसल्याचे, त्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे भासवले.
४५ वर्षीय व्यक्तीला हा फ्लॅट २३,००,००० रूपये किंमतीस विकला. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ही घटना (दि.०३/११/२०२० ते दिनांक २४/११/२०२३) फ्लॅट क्र. ४०१, कृष्णा कॉर्नर, दिघी येथे घडली.
याप्रकरणी नितीन अर्जुनराव कोठारी (वय ४५ वर्षे, धंदा-नोकरी) यांनी आरोपी १) हेमंतकुमार घनश्याम तिवारी, वय ४० वर्षे, २) महिला आरोपी (वय ३५ वर्षे), ३) महिला आरोपी (वय ३० वर्षे), ४) अनिकेत घनश्याम तिवारी (वय-३५ वर्षे), ५) कृष्णाकुमार घनश्याम तिवारी (वय ४३ वर्षे, सर्व रा. दिघी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी सर्वांच्या विरोधात ३३१/२०२४ भा.दं.वि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कटपाळे तपास करीत आहेत.












