न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खराळवाडी (दि. ६ मे २०१९) :- खराळवाडी येथील हिंदुस्तान अँण्टीबायोटिक्स कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमधील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवावी.
तसेच या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या मागणींकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे यांनी कला आहे
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खराळवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला मेघडंबरी असावी, तसेच या परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी संस्थेच्या वतीने महापालिका प्रशासनाकड दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने, संस्था पदाधिका-यांनी धरणे आंदोलन केले होते. त्याची दखल घेत, यावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनेला दोन वर्षे झाली, तरीदेखील याबाबतची कार्यवाही झालेली नाही.











