न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड अँडव्होकेट्स बार असोसिएशन पिंपरी व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी गावामध्ये श्रमदान करण्यात आले.
श्रमदानासाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कडूसकर, सचिव गोरख कुंभार, सहसचिव ॲडव्होकेट अकुश गोयल, हिशोब तपासनीस महेश टेमगिरे, सदस्य रामचंद्र बोराटे पूनम राऊत, माजी खजिनदार हर्षद नन्हे व अविनाश टेमगिरे, रामकिशन सेगल व बारचे वकील सदस्यांनी श्रमदानात उत्साहाने भाग घेतला.
श्रमदानामध्ये डोंगर उतारावर पाणी आडवण्यासाठी चर खोदण्यात आले. असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात काम केल्याने वाहून जाणारे पाणी साठवण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी सुनील कडूसकर यांनी आपण समाजाचे ऋणी आहोत ते ऋण फेड़ण्याकरिता व महाराष्ट्रामधील दुष्काळाची परस्थिती व तीव्रता पाहुन प्रत्येकाने पाणी व पर्यावर्णाचे संरक्षण केलेच पाहिजे, असे मत व्यक्त केले.











