न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- संगणमताने व्हिजन डेव्हलपर्स अँड बिल्डर्स फर्मचा विश्वासघात केला. फर्मची एकुण ८२,२५,३७० एवढी रक्कम दोघांच्या अकांउंटवर वळवली. स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता रक्कम वापरुन फिर्यादी व त्यांच्या फर्मची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि ०१/०४/२०२२ ते दिनांक ०२/०९/२०२३) दरम्यान रहाटणी येथे घडला. फिर्यादी संदीप कृष्णा आलम (वय ५३ वर्ष धंदा-व्यवसाय) यांनी आरोपी १) पोपट मुरलीधर नाटकर (वय ५० वर्षे रा. वाल्हेकरवाडी), २) महिला आरोपी (वय ४५ वर्षे), ३) गोरखनाथ रामनाथ शिंदाडे (वय ३५ वर्षे रा. दगडोबा चौक चिंचवडेनगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ८७१/२०२४, भादंवि कलम ४०९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे तपास करीत आहेत.














