न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) :- पिंपळे गुरवमध्ये चारचाकी वाहनाने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह दोघांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घटनेत कारचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे. दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. ७) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी तब्बल दीड दिवसानंतर मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शरद किसन सुरवसे (वय २६, रा. पिंपळे गुरव) आणि मानतेश लिंगाप्पा चीगनुर अशी जखमींची नावे आहेत. शरद सुरवसे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच १४/एलपी ७४९२) चालक दत्तू रामभाऊ लोखंडे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












