न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश कार्याध्यक्षा सुनिता खंडाळकर यांच्या सुचनेनुसार, शिवशाही व्यापारीसंघ महिला आघाडी मुंबई कोकण विभाग अध्यक्षा आशा ऋतुकांचन रसाळ यांच्या अनुमोदनाने व शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी शिवशाही व्यापारीसंघाच्या चेंबूर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षपदी प्रार्थना दिपक कानडे-मिटना यांची निवड केली आहे.
महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी व्यापारीवर्ग व सर्वसामान्य जनतेची तसेच दिव्यांग, विधवा माताभगिंनीची अखंड सेवा करून, शिवशाही व्यापारी संघाबरोबर शिवसेना वाढीसाठी कटिबद्ध राहण्याच्या त्यांना सुचना केल्या आहेत.
यावेळी प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश कार्याध्यक्षा महीला आघाडी सुनिता खंडाळकर, मारूती मस्के, बाळासाहेब गायकवाड, रविकिरण घटकार, रोहीत विभुत्ते, आशिष वाळके, नवनाथ माऊली जाधव, विशाल बाविस्कर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.











