न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ६ मे २०१९) :- पिंपळे सौदागरमधील गोविंद यशदा चौक परिसरात भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी या कामासाठी प्रशासनाकडे जोर लावला होता. या कामाची नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच पाहणी केली.
तसेच पिंपळे सौदागर गावठाण येथुन काटेवस्ती येथे जाण्यासाठी भुयारी मार्गाचेही काम येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. तसेच उड्डाणपुलाची दुसरी बाजू भोसरी ते हिंजवडीचे कामही प्रगतीपथावर आहे.
लवकरच ती बाजूही वाहतुकीस खुली करण्यात येणार आहे, जेणेकरुन गोविंद यशदा चौक हा सिग्नलमुक्त चौक होईल, अशी माहिती काटे यांनी यावेळी दिली.











