न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२४) :- देहूरोड येथील सुबश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ३६ बेडचे आहे. हॉस्पीटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत व मेन रोड पासुन जवळ असल्याने खुप बिझनेस होणार आहे, असे सांगुन डॉक्टर दाम्पत्यांनी दोघांचा विश्वास संपादन केला.
मेडिकल टाकण्यासाठी ११,००,००० रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच शुभम बाबुराव हरणे यांना मेडिकल शॉप टाकण्यासाठी ११,००,००० रूपये, रोहन संतोष निंबळे यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी ६,००,००० रू, प्रवीण रोशन नवले यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी १०,००,००० रूपये, सिद्धार्थ संजय बरळ यास मेडिकल शॉप टाकण्यासाठी १०,००,००० रू असे एकूण ४१,००,००० रूपये घेवुन फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना नोव्हेंबर २०२२ ते आजपावेतो ऑनलाइन पद्धतीने घडली. विजय दत्तू महाडिक (वय ३४, नवी सांगवी मुळगाव शिरापूर जि. अहमदनगर) यांनी आरोपी १) मनीष नागेश डोईफोडे, २) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी ३७१ /२०२४ भादवी सं कलम ४२०,५०६ (१) ४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोसई सोळंके तपास करीत आहेत.

















