- दोन दुकानदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२४) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील बालाजी मार्केट नावाच्या दुकानात व हनुमान सुपर मार्केट नावाच्या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या कंपनीच्या बनावट वस्तु विक्रीसाठी ठेवत त्यांची विक्री केली.
हा प्रकार (दि. १०) रोजी दुपारी ३.२० ते सायं ५.३० वा दरम्यान उघडकीस आला. फिर्यादी साजीद असगरअली अन्सारी (वय. ३४ रा. स्पाईनरोड भोसरी) यांनी आरोपी १) राजेंद्रकुमार डगलारामजी कुनेचा (वय. २९ वर्षे रा. गणेश मंदीरा जवळ, संत तुकाराम नगर, पिंपरी), २) रुपाराम वेलाजी चौधरी (वय. ४३ वर्षे रा. संत तुकारामनगर पोलीस चौकी मागे, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७१८/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धनंजय कापरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास करीत आहेत.

















