न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांकडून ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पिंपरी- चिंचवड शहर पोलिस दलातील दोन पोलिस निरीक्षकांसह २६ अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. तसेच, चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन पोलीस निरीक्षक, ६ सहायक निरीक्षक, १८ फौजदार आणि १ पोलिस अंमलदार अशा २७ जणांना हे पदक जाहीर झाले. शिरगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी नक्षलग्रस्त भागात साडेतीन वर्ष सेवा केली. दरम्यान, त्यांना सेवाकाळात शंभरपेक्षा अधिक रिवार्ड मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले.
सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी गोंदिया येथे सेवा केली असून त्यांनाही पदक जाहीर झाले. चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. त्यात बंडु मारणे (सहायक फौजदार), चंद्रघर कोंडे, सचिन चव्हाण, हनुमंत कांबळे (पोलिस हवालदार) यांचा समावेश आहे.
यांना मिळाले ‘विशेष सेवा पदक’..
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, तेजस्विनी कदम, सहायक पोलिस निरीक्षक गणपत धायगुडे, सचिन घाटे, नवनाथ मोटे, आसाराम चव्हाण, विठ्ठल करंबळकर, जोहेब शेख, पोलिस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आटवे, विठ्ठल सूर्यवंशी, सोहन धोत्रे, बालाजी मेटे, संतोष जायभाये, श्रीकिशन कांदे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टार्के, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे, पोलिस शिपाई योगेश्वर कोळेकर वांना पोलिस महासंचालकांचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले.












