न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- कासारवाडी परिसरात इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत हकनाक बालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची पिंपरी चिंचवड महापालिकेने दखल घेतली असून, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. तसेच त्याचा अहवाल एक महिन्याच्या आत प्रशासनास सादर करण्याचे प्रभारी आयुक्त संतोष पाटील यांनी फर्मान सोडले आहे.
या दुर्घटनेस महापालिका अधिकारी की ठेकेदार जबाबदार आहेत, याची निश्चिती केली जाणार आहे. या त्रिसदस्य समितीत प्रभागी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि प्रशासन अधिकारी आशा राऊत यांचा समावेश आहे.











