- वाल्हेकरवाडी, रावेत भागातील सात हॉटेलवर हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- शहरातील बेकायदेशीर हॉटेल, बार, पबवर महापालिकेने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. शहरातील ९० हॉटेल, बार, पबमध्ये वाढीव बांधकाम केल्याचे समोर आले आहे. वाल्हेकरवाडी, रावेत भागातील अशा सात हॉटेलवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि इतर व्यावसायिक इमारतींची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिक इमारतींचे संबंधित व्यवसाय मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक आहे.
हॉटेल, पब, बारवर इमारतीत मंजूर बांधकामांपेक्षा अधिक बांधकाम, प्रत्यक्षात जागेच्या वापरात बदल, अशा प्रकारची अनियमितता आढळून आली. त्यावर पालिकेने शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या आस्थापनांवर पालिकेने कारवाई सुरु केली आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट येथे बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्यास परवानग्या रद्द करण्यात येणार आहेत.
रावेत, वाल्हेकरवाडी येथील पवना नदीच्या पूररेषेत बांधलेल्या टॉप ८७ हॉटेलला नोटीस देवून चोवीस तासात संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त केले. वाल्हेकरवाडी येथील जगदंब हॉटेल, गुणाजी ढाबा, शिवराज हॉटेल, जय मल्हार हॉटेल, मराठा पॅलेस हॉटेल, गावकरी थाट या सात हॉटेलवर कारवाई केली. तर, रावेतमधील हॉटेल न्यू दिल्ली दरबार, हॉटेल भोंडवे मळा आणि हॉटेल गाव चावडी या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार आहे.















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)


