न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- ‘आजी चाफेकर चौकात राशन वाटप चालु आहे, चल तुला राशन घेऊन देतो’ असं आमिष दाखवत कमरेला लावलेली पिशवी व त्यात असलेले ३१.११ ग्रॅम वजनाचे ९२,१८० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोघांनी चोरुन नेले.
हा प्रकार (दि. १८) रोजी दुपारी १२:०० वा.चे सुमारस चाफेकरचौक, चिंचवड येथे घडला. फिर्यादी नागरबाई प्रभाकर सपकाळ (वय ७० वर्ष) यांनी आरोपी दोन अनोळखी चोरटे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिंचवड पोलिसांनी ३२६ /२०२४ भारतीयन्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि करंबळकर तपास करीत आहेत.














