न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- शाळेत शिकणाऱ्या मुलाचा भाऊ स्वतः ट्रक चालवतो. हप्ता देत नाही याचा राग मनात धरून दहा जणांनी हप्त्यासाठी जबरदस्तीने मुलाला दुचाकीवर बसवले. खंडणीकरीता त्याचे अपहरण केले. भावाला बोलावुन घेण्यासाठी फोन लावण्यास सांगितला. भाऊ ट्रक घेवुन बाहेर गेला असल्याने व तो दोन-तीन दिवसांनतर येणार असल्याचे समजताच “कारे भाडखाउ हप्ता देत नाहीस काय, जो पर्यंत हप्ता देणार नाही तो पर्यंत तुझ्या भावाला सोडणार नाही.” असे फोनवर बोलुन फोन कट केला.
अपहरण केलेल्या मुलाला शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. जर पोलीसात तक्रार दिली तर तुला पुन्हा सोडणार नाही, तुला जिवे मारुन टाकु.” अशी धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १९) रोजी सकाळी १०.३० वाजण्याचे सुमारास १) दुर्गानगर, सोनवणेवस्ती रोड, चिखली, २) महादेवनगर, महादेव मंदीराचे शेजारी, श्री. आकाश तापकिर यांचे दुकानासमोर, चिखली येथे घडला.
फिर्यादी निलेश ग्यानदेव घाडगे (वय १६ वर्षे, धंदा शिक्षण, चिखली) याने आरोपी १) अंबादास राठोड, २) अफझल शेख, ३) गणेश नप्ते व त्यांचे इतर सहा ते सात साथीदार (पुर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत.) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ४७८/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम १४०(२), ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(३), १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३), १९६, सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह-१३५, ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे पुढील तपास करीत आहेत.














