न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- कामगाराचा पगार वाटप करण्यासाठी (दि.०९/०७/२०२४) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून जात होते. रावेत येथील लंडन ब्रीजजवळ गाडीचे चाक पंक्चर झाले. फिर्यादीने त्यांच्याकडील पैशाची बॅग दुचाकीवरील दुसऱ्या साथीदाराकडे दिली व ते पुढे निघून गेले.
दुकानात गाडी पंक्चर काढण्यासाठी लावली व बाहेर येवुन पाहिले असता फिर्यादीकडील १,४६,५०० रुपये रोख रक्कम असलेली पैशाची पिशवी घेऊन तो फरार झाला होता. त्या पैशांचा त्याने अपहार केला आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सुर्यकांत भालचंद्र पांचाळ (वय ४२ वर्ष, धंदा नोकरी) यांनी आरोपी नागनाथ दत्ता सोरगे (रा. कळंबर बुद्रुक, नांदेड) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. रावेत पोलीस ठाण्यात ३१६/२०२४ भा. न्यायसंहीता कलम ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोफौ सोनावने पुढील तपास करीत आहेत.















