न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- निगडीतील धन्वंतरी हॉस्पीटलच्या ईमेल आयडीवर ई मेल धारक वापरकर्ता याने “मी हॉस्पीटलच्या इमारतीत बॉम्ब ठेवला. बॉम्ब हॉस्पीटलच्या बेडखाली आणि बाथरुममध्ये लपलेले आहेत. इमारतीतील प्रत्येक व्यक्ती मारली जाईल किंवा त्याचे हातपाय गमवाल, या नरसंहारामागे चिंग आणि कल्टिस्ट आहेत” वगैरे मजकुर ई-मेल पाठवला.
ईमेल धारकाने धन्वंतरी हॉस्पीटलमध्ये येणा-या नागरीकामध्ये भितीचे वातावरण तयार करण्यासाठी अफवा पसरविली आहे, असं फिर्यादीत म्हंटले आहे. ही घटना (दि. १८) रोजी सायं ६.१० वा. सुमा. धन्वंतरी हॉस्पीटल, टिळक रोड प्राधीकरण-निगडी येथे ऑनलाईनद्वारे घडली आहे.
सुधीर रंगराव पाटील यांनी आरोपी hiddenbones101@gmail.com हा अज्ञात मेलधारक वापरकर्ता याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलिसांनी ३६८/२०२४ बी.एन, एस. ३५३, ३५१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि देशमुख पुढील तपास करीत आहेत.


















