न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नागरिकांना मारहाण आणि अल्पवयीन मुली व महिलांचा विनयभंग करीत परिसरात दहशत माजविणाऱ्या विकृताच्या विरोधात ४० महिलांनी थेट पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेतली.
महिलांचे गा-हाणे ऐकल्यानंतर आयुक्तांनी त्या विकृत तरुणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकास ऊर्फ बंटी मधुकर चंदनशिवे (२९ रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या माथेफिरूचे नाव आहे. विकास हा गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातील नागरिकांना त्रास देत होता.
तसेच त्याने अनेकवेळा तरुणी महिलांचा विनयभंग व वाहने पेटविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरात त्याची मोठी दहशत पसरली होती. आयुक्तांच्या आदेशानंतर काही वेळातच पोलिसांनी त्या विकृताला अटक केले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











