न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- बदलापूर, कलकत्ता तसेच महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
या बंदमध्ये पिंपरी चिंचवडमधील महाविकास आघाडी, विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी १० वाजता पदयात्रा काढत ‘सत्याग्रह आंदोलन’ केले जाणार आहे. या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केला आहे.
यासंदर्भात पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना (उबाठा गट) शहरप्रमुख सचिन भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.












