न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- देहुतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिरातील पारदर्शक कारभारासाठी प्रशासकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे. मंदिर प्रशासनाची अडीच हजार हेक्टर जमीन आहे. त्याचप्रमाणे मंदिरात सोने, चांदीसह इतर वस्तू देणगी स्वरुपात येतात.
यापूर्वी मंदिर भ्रष्टाचाराबाबत मोरे संस्थानिकातील एकाने तक्रार केली होती. मात्र, राजकीय दबावापोटी त्यावर कार्यवाही झाली नाही. येत्या २४ जूनपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरु होणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर प्रशासकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.











