न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- बोपोडी व जवळच्या परिसरांमध्ये डासांचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. डासांच्या चावण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते.
त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाने तात्काळ पाऊले उचलावीत, अशी मागणी बोपोडी मनसे अध्यक्ष अंकित नाईक यांनी प्रशासनाकडे केली होती. याची प्रशासनाने दखल घेउन, परिसरात सर्वत्र धूर फवारणी केली आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी पाऊले उचलली आहेत.











