न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- रुपीनगर-गणेशनगर रस्त्यावरील रुपीनगर, तळवडे येथील सई मेडीकल हे दुकान शटर लावुन बंद असताना अज्ञात चोरट्याने शटर उचकटुन आत प्रवेश करीत ड्रावरमधुन रोख रक्कम ४०,००० रुपये चोरली.
तसेच बाजुच्या श्री मेडीकलचे शटर उचकटुन त्याच्या ड्रावरमधील ६०० रु. रोख रक्कम चोरली. याशिवाय समर्थ मेडीकलचे शटर उचकटुन आत प्रवेश करुन त्या ड्रावरमधील ८०० रुपये रोख रक्कम असे एकुण ४१,४०० रुपये चोरुन नेले आहेत. हा प्रकार (दि. २४ रोजी रात्री १२.०० वा. ते दि.२५ रोजी ६.०० वा चे दरम्यान उघडकीस आला.
याप्रकरणी ऋषिकेश काकासाहेब निबांळकर (वय २५ वर्षे, रुपीनगर तळवडे) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४८४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि मोटे पुढील तपास करीत आहेत.












