न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- इंदोरीतील श्री शनि मारुती मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शनिवार (दि. ४) रोजी ट्रस्टच्या वतीने पुढील नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येत्या शनिवार (दि. ११) रोजी मंदिराचा प्रथम वर्धापन आहे. या बैठकीत पुढील कालावधीसाठी श्री शनि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट, इंदोरी, कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सचिन नथुराम अवसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच जयंत सूर्यकांत राऊत कार्याध्यक्ष, प्रशांत चंद्रकांत भागवत उपाध्यक्ष, विनोद दत्तात्रेय शिंदे सचिव, विनोद उद्धवराव भागवत खजिनदार, प्रवीण नथुराम अवसरे, राहुल शंकरराव भागवत, मनोहर भाऊ भागवत, चंद्रकांत कर्डिले, नागेश बबन भागवत, योगेश सूर्यकांत राऊत, निखील नंदकुमार भागवत, निलेश शिंदे, राजु शिंदे, अनिकेत मधुकर भागवत, रोहिदास उबाळे, अनिल धोंडीबा राऊत, पंकज चंद्रकांत जगनाडे, बाळासाहेब मखामले, कुलदीपक शंकर उबाळे, योगेश किर्वे, किसन अंबिके, श्रीहरी पेंडभाजे, संयोजक व प्रसिद्धीप्रमुख श्री भालचंद्र गजानन राऊत, कायदेशीर सल्लागार संजय शिंदे, व्यवस्थापक तुकारामबुवा शंकर जगनाडे, वासुदेव तुकाराम उबाळे, मधुकर ज्ञानोबा भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.











