सध्या अनिल कपूर फन्ने खाँ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच तो सलमान खानच्या दस का दम शोमध्ये आला होता. दोघांनी शोमध्ये खूप धमाल केली. पण एक गंमत झाली. अनिल कपूरनं सिनेमाबद्दल सांगताना ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं आणि सलमान खानच्या डोळ्यात एकच चमक दिसली. सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप होऊन बरीच वर्ष उलटली. पण तरीही सलमानच्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम काही लपत नाही. यावेळी प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. पार्श्वभूमीवर हम दिल दे चुके है सनमचं संगीत वाजत होतं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.
अनिल कपूरनं सिनेमाबद्दल सांगताना ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं आणि सलमान खानच्या डोळ्यात एकच चमक दिसली.


















