सविता दामोदर परांजपे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक. आणि आता हे नाटक सिनेमाच्या रूपात येतंय. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका आहे. सिनेमाची निर्मिती केलीय जाॅन अब्राहमनं, तर स्वप्ना वाघमारे जोशीनं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. या गाजलेल्या नाटकावरच्या सिनेमात काम करायला मिळतंय, याबद्दल सुबोध भावेनं स्वत:ला नशीबवान म्हटलंय. तर सविता दामोदर परांजपे ही अजरामर भूमिका रीमा लागूंनी केली होती. सिनेमात या भूमिकेचं आव्हान पेलताना छान वाटलं, असं तृप्ती सांगते. दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी म्हणतात, बरेच दिवस या नाटकावर सिनेमा करायचं डोक्यात होतं. जाॅन अब्राहमची साथ मिळाली, मग अजून काय हवं?
सुबोध भावेच्या ‘सविता दामोदर परांजपे’चा फर्स्ट लूक पाहिलात का?


















