न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- आळंदीतील इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या त्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला.
रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार यांनी इंद्रायणीनदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे. मात्र हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.