न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- आम आदमी पार्टीच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ डांगे चौक, थेरगाव शिवाजी पुतळ्या समोर सरकारच्या विरोधात जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
त्यावेळी आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीना जावळे यांनी तीव्र भाषेत निषेध नोंदविला. तसेच चेतन बेंद्रे पदवीधर आघाडी महाराष्ट्र राज्य व संतोष इंगळे उद्योग आघाडी सचिव महाराष्ट्र राज्य यांनीही तीव्र भाषेत निषेध नोंदविला.
यावेळी पक्षाचे कार्यकर्ते रविराज काळे, वैजनाथ शिरसाठ, ब्रह्मानंद जाधव, सुरेश बावनकर, अजय सिंग, रोहित सरनोबत, गायकवाड, सरोज कदम, भारती जाधव, दमयंती नेरकर, सीमा बावनकर, सचिन थोरात, जावळे, पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.












