न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- हॉटेलचे बील भरीत असताना महिलेच्या पतीच्या अंगावर एकाने कागदाची चिठ्ठी फेकली. त्यावरून दोघात वाद झाला. महिलेच्या पतीच्या कानाखाली लगावली. महिलेला हॉटेल मालक याने फोन करुन “मी साई अमृत लॉज चामेनशेठ बोलतो. तुमचा काय विषय झाला आहे तो मिटवु, तु साई अमृत लॉज, महाळुंगे येथे ये.” असे म्हणाला.
पती व मुलांसह महिला लॉजवर गेली असता पाच जनांनी संगनमत करुन महिलेच्या पतीला लॉजमध्ये हातातील लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेशुध्द होईपर्यंत मारहाण केली. पतीला सोडण्यासाठी गेलेल्या महिलेलाही कानाखाली मारली. दरम्यान हॉस्पीटलमध्ये उपचार चालू असताना उपचारादरम्यान महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १९) रोजी रात्री ७.४५ वा ते (दि. २०) रात्री ०२:३० वा. दरम्यान साई अमृत लॉज, इन्डोरन्स चौक ते एच पी चौक रोडवर, महाळुंगे ता. खेड येथे घडला.
फिर्यादी २३ वर्षीय महिलेने आरोपी १) दिपक मधकुर जाधव वय २५ वर्षे दिघी समर्थनगर ५ नंबर बिल्डींग दिघी, २) दिपक सुभाष सोनवणे वय २६ वर्षे रा साई अमृत हॉटेल हरमण कंपनी समोर महांळुगे, ३) तेजस सोपान गाढवे वय अंदाजे २६ वर्षे, रा प्रियंका हौसिंग सोसायटी प्लॉट नंबर ६ ब विंग स्पाईनरोड मोशी, ४) सचिन बालाजी चांदुरे वय ३३ वर्षे, ५) अक्षय मारुती पाटील वय २७ वर्षे रा चिखली सानेचौक कोयनानगर लक्ष्मीसोसायटी चिखली, ६) बंटी वय पत्ता माहित नाही, ७) गोल्या वय २२ ते २५ वर्षे पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५७१/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चेकलम १०३ (१), १८९(२), १९१(२),१९०, ११५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र १ ते ५ अटक आहेत. पोनि गुन्हे कांबळे तपास करीत आहेत.