न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- भरधाव वेगात आलेल्या टाटा पिकअप टेम्पोच्या चालकाने अॅक्टीव्हा गाडीला जारात धडक दिली. त्यात फिर्यादीचे मेव्हणे व फिर्यादीची बहिणी हे गंभीर जखमी झाले. फिर्यादीच्या बहिणीचा मृत्यू झाला. टेम्पो चालक त्यास कारणीभूत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २७) रोजी रात्री ९.०० च्या सुमारस स्वामी विवेकानंद ग्रेड सेपरेटरजवळ, शरदनगर, चिखली येथे घडला. फिर्यादी अशोक लक्ष्मण कामठे (वय ३२ वर्ष) यांनी आरोपी भागवत अर्जुन सलगर (वय ६० वर्ष, ड्राईव्हर रा. पत्रा रोड नं ५८२ कस्तुरी मार्केट जवळ अजंठानगर चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलिसांनी ४९१/२०२४ बी, एन, एन कलम २८१,१२५ (ब),१०५,३२४ (४) मो, व्हि अॅक्ट कलम १८४,११९/ १७७ प्रमाणे चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि बाबर पुढील तपास करीत आहेत.