न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२४) :- चिखलीतील रोकडे वस्ती जवळील चप्पलच्या दुकानासमोर (दि. २८) रोजी सायं ७.३० च्या दरम्यान दोघे गणपतीची वर्गणी गोळा करीत होते. दरम्यान हातामध्ये कोयते, काठ्या, हॉकी स्टीक, लोखंडी रॉड घेवून टोळक त्यांच्याजवळ आलं. त्यावेळी तेथील दुकानदारांनी दुकाने बंद केली.
सोन्या तापकीरची रिक्षा चालविण्यावरून तसेच गणपतीची वर्गणी टोळक्याच्या एरियामध्ये गोळा करण्याच्या कारणावरुन लोखंडी रॉड तरुणाच्या डोक्यामध्ये मारला. आरोपी १ याने हॉकी स्टीकने हातापायावर मारहाण केली. आरोपी क्र ४ याने त्याच्या हातामधील काठीने तसेच त्यांच्या सोबत असलेल्या इतर ३ ते ४ अनोळखी लोकांनी तरुणाला काठीने व हाताबुक्यांनी मारहाण केली. आरोपी क्र २ हा तरुणाला जीवे ठार मारण्यासाठी त्याचे हातामधील कोयता डोक्यात मारीत असताना कोयता अडविल्याने कोयता तरुणाच्या उजव्या हातानला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणाच्या पॅटचे खीशामध्ये असलेली गणपतीची वर्गणी रोख रक्कम १३,००० रु व तरुणाची स्वतःची ४,००० रु अशी एकुण १७,००० रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली, अशी फिर्याद महेश प्रदिप गुणेवाड (वय-२१, रिक्षा चालक रा. पाटीलनगर, चिखली) याने नोंदविली आहे.
याप्रकरणी १) प्रज्वल रोकडे, २) मानव रोकडे, ३) ओम नरवडे, ४) यश नरवडे (सर्व रा. रोकडे वस्ती, चिखली), त्यांच्या सोबत ३ ते ४ इसम यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ४९५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०९, ११९ (१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२,३५१ (२) शस्त्र अधि. १९५९ चे कलम ४/२५ क्रिमीनल लॉ अॅमेडमेट सन १९३२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि खारगे तपास करीत आहेत.