न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२४) :- लग्नात मानपान केला नाही, जास्त वस्तु आणलेल्या नाहीत, या आणि घरातील प्रापंचिक कारणावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. विवाहितेला हाताने मारहान केली. घराबाहेर निघुन न देता तिच्यावर पाळत ठेवली. संशय घेऊन विवाहितेला आत्महत्यास प्रवृत्त केले. रामनगर, ताथवडेतील कोहिनुर सफायर येथील राहत्या बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली आहे.
हा प्रकार (दि २८/०४/२०२४ पासुन दि. २८/०८/२०२४ पर्यंत) रात्री ०८.१९ वा चे दरम्यान घडला. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील प्रदिप नारायणराव जमीनदार यांनी आरोपी १) पती केशरीनंदण तेजनारायणलाल कर्ण (वय ३३ वर्षे रा. कोहिनुर सफायर रामनगर, ताथवडे), पती) २) सासु महिला आरोपी, ३) सासरे तेजनाराणलाल कर्ण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ९४१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८०, ८५, ११५ (२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पवार पुढील तपास करीत आहेत.