न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- लोकसेवकाला महाराष्ट्र शासन निर्णय अन्वये सरकारी कार्यात मदत करणे बंधनकारक आहे, असे समजुन सांगुन तसेच कार्यालयाकडुन घटनास्थळ पंचनामा करण्याचे लेखी आदेश असताना देखील सरकारी कामात मदत करणे कायद्याने बंधनकार असताना देखील साह्य करण्याचे टाळुन घटनास्थळी पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला.
हा प्रकार (दि. २७/०८/२०२४) रोजी सायं ५.२० वाजता पिंपरी पोलीस स्टेशन येथे घडला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गुन्हे, पिंपरी पोलीस स्टेशनचे सुहास आव्हाड यांनी विठ्ठल हरिदास आव्हाड (वय ४३ वर्ष रा गौतनगर पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात ७६५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१५,२२२, २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार १३३७ सोनमाळी तपास करीत आहेत.