न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- दुकानात इतर कंपनीचे स्वामित्व असणाऱ्या बनावट वस्तु हर्पिक टॉयलेट, व लायझॉल विक्रीकरिता ठेवल्या. एकुण ५५,६०४ रु. किं. च्या वस्तूंची विक्री करीत असताना व विक्री करीता ठेवलेल्या वस्तू निदर्शनास आल्या.
हा प्रकार (दि ३१/०८/२०२४) रोजी ०८.१० वाजता विकासनगर किवळे, देहूरोड येथे घडला. साजीद असगरअली अंन्सारी यांनी आरोपी नेनाराम चेतनराम चौधरी (वय २६ वर्षे, रा. जानकी क्रिस्टल सोसा. शॉप नं ०३ विकासनगर देहूरोड) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
देहुरोड पोलिसांनी ३८९/२०२४, कॉपीराईट अँक्ट सन १९५७ चे कलम ६३,६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा १५७१ विधाते मारे पुढील तपास करीत आहेत.