न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :-पोलीस ठाण्यासह सार्वजनिक रस्त्यावर गाड्या आडव्या लावल्या. पोलिसांसह नागरिकांचा वाहुतूकीचा रस्ता आडवला. वाहने काढण्यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी गेले असता त्यांना तिघांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळी करून शासकीय कामकाज करण्यास अडथळा केला. त्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली.
पोलीसांना हाताबुक्याने मारहाण केली. ज्वलनशिल पेट्रोलची बॉटल पोलीस ताब्यात घेत असताना बॉटलचे टोपन उघडुन त्याव्दारे त्यातुन पेट्रोल स्वतःच्या आणि पोलीसांचे अंगावर पडुन त्यांच्या जिवितास धोका निर्माण केला, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ०४) रोजी सायं ६००. वा. ते ७.३०. सुमा दिघी पोलीस स्टेशन समोर घडला. दिघी पोलिसांनी ३७०/२०२४ भारतीय न्याय सहिंता २०२३ कलम १३२, १२१(१), १२६ (२) २२४, २९६, २२१, ३५२, ३५१(२) ३५१ (३) २८५, १२५ (ए) ११५ (२) ३ (५) प्रमाणे आरोपी १) कंठाराम दामोदर वय ५२ वर्षे, २) अशिष कंठाराम दामोदर वय २० वर्षे, ३) महिला वय ४५ वर्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि अंभोरे पुढील तपास करीत आहेत.











