- अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; महापालिकेची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- आरक्षित भुखंडावर व खाणीमध्ये हायवा गाडीतील राडारोडा टाकताना पालिकेचे पर्यावरण विभागाचे पथक व म.सु.बा. जवान यांच्या निदर्शनास आले. कारवाई करून हायवा हा म.न.पा. नियमावली प्रमाणे राडारोडा संकलन केंद्र मोशी येथे जमा करण्यासाठी नेत असताना हायवा मालक आरोपी क्र २ याने हायवा गाडी अडवली. म.सु. बा. जवानांसोबत वाद घालत अर्वाच्च भाषेचा वापर केला. संबंधित हायवाची चावी काढुन फरार झाले. त्यानंतर काही तासांनी आरोपी क्र २ याच्याकडुन चावी मागुन सदर हायवा हा राडारोडा संकलन केंद्र मोशी येथे जमा करण्यात आला.
संबंधित हायवामध्ये दगड धोंडे होते. त्याचे वजन मोशी येथील वजनकाट्या नुसार ३०.०१ टन इतके झाले. आरक्षित भुखंडावर व खदानीमध्ये राडारोडा टाकत असल्याने संबंधित व्यक्तीने सार्वजनिक उपद्रव केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २) रोजी दुपारी १२.३० वा. सुमा. पिंपरी चिंचवड महानगर पालिका नवीन प्रशासकीय इमारती शेजारी सिटी सेंटर जवळील खदानीत, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी स्वप्नील मनोहर पाटील (वय ३८ वर्षे धंदा कनिष्ठ अभियंता पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी आरोपी १) मंगेश भाऊसाहेब तिखे (रा. शिंदेवस्ती दत्त मंदिराजवळ रावेत) २) अजित बारणे (रा. थेरगाव पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७७४/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७३, २७९,३५२, पर्यावरण संरक्षण अधि कलम १५ (१) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि डोंगरे पुढील तपास करीत आहेत.











