- राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरीत आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- आमदार नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्यात येत असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथे आक्रमक आंदोलन घेण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले.
इम्रान शेख म्हणाले, “गेल्या काही दिवसा पासून नितेश राणे मुस्लिम समाजाविरुद्ध गरळ ओकून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक भाषणात संविधानाचे संकेत पायदळी तुड़वत हिंदू-मुस्लिम दंगल व्हावी यासाठी आटापिटा करत आहे. काल परवा नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून मशिदीत घुसुन एकेकाला मारण्याची म्हणजेच मुस्लिम समाजाच्या नरसंहाराची धमकी दिली.दीड-दमडीची सामाजिक ऐपत नसलेल्या या कोंबडी चोराने पोलीस बांधवाबद्दलदेखील घाणेरडे शब्द उच्चारले.फक्त गृह विभागाच्या ढिलेपणामुळे याचे धाडस वाढत आहे.योग्य वेळी याला कायद्याचा बड़गा दाखवला नसल्यामुळेच तो दररोज कायद्याला आव्हान देत सुटला आहे. मागील काही वर्षापासून भाजप पक्ष आणि त्यांचा नेत्या कडून धार्मिक द्वेषाचे वातावरण तयार करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असून दुर्दैवाने त्याला देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय पाठबळ मिळत असल्याने अश्या वाईट प्रुवृत्तीस बळ मिळत आहे. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी अशोभनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की,आपल्या राज्याची नकारात्मक प्रतिमा उभी करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कड़क कार्रवाई करण्यात यावी.तसेच देशद्रोहाच्या गुन्ह्यामधे त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, शहर कार्यअध्यक्ष देवेंद्र तायडे, मौलना अब्दुल गफ्फार, महिलाअध्यक्षा ज्योती निंबाळकर, कार्याध्यक्ष सागर तापकीर, मा. नगरसेविका प्रियांका बारसे, मा उपमहापौर विश्रांती पाडळे, संदीप चव्हाण, सचिन गायकवाड, अन्वर पानसरे, साकी गायकवाड, मेघराज लोखंडे, रजनीकांत गायकवाड, शाहिद शेख, मयूर खरात, रेखा मोरे, आश्रफ शेख, हबीब शेख, तायरा सय्यद, कल्पना गाडगे, कविता कोंडे, कमरुनिसा शेख, काँग्रेसचे शाबुद्दीन शेख, अल्पसंखाक विभागाचे अल्ताफ शेख, हाफिज मोईन, विवेक विधाते, विकास कांबळे, किरण डावकर, शाकीब शेख, अरबाज शेख, अनिकेत गायकवाड, विजय वाघमारे, सिद्धांत कसबे, जमीर सय्यद,अवधूत कदम अभिषेक साबळे,परवेज शेख,सार्थक बाराते अभिजीत कोळेकर,राहील शेख,राजेश हरगुडे प्रशांत कालेल,साहिल वाघमारे,हनीफ शेख नियमत शेख,फहिम शेख,साहिल वाघमारे, दिनेश पवार,पुष्पा जानराव,राजश्री करंडे तसेच मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थिस्त होते.














