न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२४) :- गेल्या अनेक दिवसापासुन फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
कृष्णासिंग भारतसिंग बावरी (वय ३९) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला ओटा स्किम, निगडी येथुन ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.














